कुस्ती म्हणजे शक्ती अन्‌ बुद्धीचा खेळ : आ. अहिरे

विभागीय कुस्ती स्पर्धा उत्साहात

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-04 14:52:54

देवळाली कॅम्प : कुस्ती म्हणजे मल्लाच्या शक्ती आणि बुद्धीची परीक्षा पाहणार खेळ आहे. कुस्तीची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. योद्ध्यांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारी आपली भूमी पहिल्यापासूनच मातीशी आपले नाते जपणारी आहे, असे प्रतिपादन आमदार सरोज अहिरे यांनी केले. भगूर येथील बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्थात बलकवडे व्यायामशाळा येथे पहिलवान भगवानराव जुंद्रे यांच्या स्मरणार्थ लोहशिंगवे फेस्टिव्हलअंतर्गत विभागीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 
              जुंद्रे पहिलवान शिक्षण संस्था, लोहशिंगवे आणि एम जे एम महाविद्यालय, करंजाळी तसेच नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोहशिंगवे फेस्टिवल अंतर्गत पहिलवान भगवानराव जुंद्रे यांच्या स्मरणार्थ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत पहिलवानांनी सहभाग नोंदविला. आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रमख पाहुणे पहिलवान ॲड. गोरखनाथ बलकवडे, रवींद्र मोरे, दिनकर पाटील, नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल बलकवडे, पहिलवान वाळू नवले, उत्तम दळवी, अशोक मोरे, विष्णू बेरड, राम जुंद्रे, सरपंच युवराज जुंद्रे, तुकाराम पाटोळे, पहिलवान दीपक जुंद्रे, शिवानी डांग, कैलास पाटोळे यांच्यासह नामांकित पहिलवान उपस्थित होते. यावेळी आमदार अहिरेंनी उपस्थित पहिलवान, वस्त्ताद यांच्याशी संवाद साधला. स्पर्धेत विजयी संघ भगूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे आयोजन डॉ. दीपक जुंद्रे यांनी केले. 

स्पर्धेचा निकाल  

कुस्ती (मुली) ५० किलो वजन गट- दीपाली शेणे करंजाळी, प्रतिभा सारुक्ते करंजाळी, ५३ किलो वजन गट- माया जाधव इगतपुरी, रूपाली रौंदळ मालेगाव, ५५ किलो वजन गट- अश्विनी आहेर देवळा, प्रांजल बच्छाव देवळा. ५७ किलो वजन गट- संस्कृती शिरसाट सिडको., ५९ किलो वजन गट- आकांक्षा नलावडे करंजाळी, आकांक्षा गांगुर्डे केबीटी नाशिक, ६२ किलो वजन गट- साक्षी आहेर देवळा, पूनम पवार देवळा, ग्रीको रोमन कुस्ती ५५ किलो- सोहेल शेख करंजाळी, सुशांत तागड मालेगाव, ५० किलो- किरण भगत इगतपुरी, ओमकार काळे विंचूर दळवी, ६३ किलो- ज्ञानेश्वर गायकवाड देवळाली कॅम्प, ऋषिकेश देशमुख नाशिक, ६७ किलो- सिद्धेश गायकवाड करंजाळी, शिवराज मोरे करंजाळी, ७२ किलो- देवेंद्र लहाने केटीएचएम, सार्थक शेटे करंजाळी, ७७ किलो- जयदीप देवरे शिरसोंडी, शुभम वाघ देवळाली कॅम्प, ८२ किलो- अरबाज शेख निमगाव, प्रणव लोंढे सिन्नर, ८७ किलो- ओमकार झाडे करंजाळी, ९७ किलो- गौरव देवरे मालेगाव, अमोल खैरनार, देवळा.