नांदेडचे अभियंते इराणमध्ये बेपत्ता: कुटुंब चिंतेत

पत्नीने केली शोध लावण्याची मागणी

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-31 19:26:58

नांदेड :- वसमत येथील अभियंता योगेश उत्तमराव पांचाळ हे इराण येथील सादीक यांची कंपनी पाहण्यासाठी ५ डिसेंबर रोजी मुंबई  येथून इराण येथे गेले. मात्र  ७  डिसेंबरपासून त्यांचा संपर्कच झाला नाही. गेल्या 24 दिवसांपासून त्यांचा कुटुंबाशी  संपर्क तुटला असल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. योगेश यांच्या पत्नी पांचाळ यांनी या संदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच नांदेड पोलीस अधीक्षक व खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. सरकारने माझ्या पत्नीचा शोध लावावा,  अशी विनंती योगास पांचाळ यांच्या पत्नी श्रद्धा पांचाळ यांनी केली आहे.

वसमत येथील कारखाना रोड भागातील रहिवासी असणारे अभियंता योगेश उत्तमराव पांचाळ हे नांदेड मध्ये पत्नीसह राहतात. काही दिवसांपूर्वीच श्रीयोग एक्सपोर्ट नावाने नवीन कंपनीची नोंदणी केली होती. योगेश पांचाळ इराण येथील सादीक यांची कंपनी पाहण्यासाठी 5 डिसेंबर रोजी मुंबई  येथून इराण येथे गेले. त्या ठिकाणी ते तेहराण मधील बहारेस्तान हेरिटेज या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांचा व्हिडीओ कॉलवरून सादीक यांच्याशी संपर्कही झाला होता. तसेच त्यांनी नांदेड येथे पत्नी आणि लहान मुलाशी संपर्क केला.  त्यानंतर योगेश यांचा परतीचा प्रवास दि. ११  डिसेंबर रोजी असल्यामुळे त्यांनी विमानतळावर संपर्क साधला असता योगेश विमानात बसलेच नसल्याचे सांगण्यात आले. २४ दिवसापासून संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत. 

  सीबीआयशी याबाबत आमचा पूर्ण पत्र व्यवहार झाला असून पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी  सांगितले आहे.